गोकुळ दूध संघ हा शेतकरी भिमुख संघ:पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ ने लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केलेली आहे. म्हणूनच ‘गोकुळ’ हा शेतकरीभिमुख संघ आहे. शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हीच आमची एक वर्षाची भूमिका राहिलेली आहे. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर वर्षपूर्ती आढावा पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. या वर्षामध्ये लाखो दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक, संघाचे कर्मचारी, अधिकारी, वितरक, दूध वाहतूक ठेकेदार या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हिताचे व प्रगतीचे निर्णय घेणे शक्य झाले असेही ते म्हणाले. मुंबई हे मोठे मार्केट आहे. मुंबईमध्येच आता नवीन जागेत विस्तारीकरण करत आहे. गोकुळ हा एक ब्रँड म्हणून विकसित होत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आत्ता दूध संकलन कमी आहे. परंतु एक लाख लिटर दूध संकलनाचा उद्देश आम्ही सर्व संचालक मंडळाने ठेवला आहे. कोल्हापुरात दोन मातृसंस्था अस्तित्वात आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ. यांनी कोल्हापूरच्या विकासाला हातभार लावलेला आहे. लाखो शेतकऱ्यांचे जीवन सुखी करण्यात गोकुळ चा मोठा वाटा आहे. वर्षभर दर स्थिर ठेवून नंतर दर वाढवले गेलेले आहेत. तसेच बाय प्रॉडक्टवर भर देण्यासाठी व पुढील दोन वर्षात बाय प्रॉडक्टचे मार्केट कसे वाढवता येईल यावर देखील विचार करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढवणार्‍या व दूध उत्पादकांना स्वावलंबी बनवणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ मधील सत्तांतरा नंतरचे पहिले वर्ष. हे संकल्पपूर्तीचे व सर्वच घटकांमध्ये संघाप्रती विश्वास वृद्धिंगत करणारे ठरले आहे. वर्षापूर्तीबद्दल राबवलेल्या सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यामुळे गोकुळची वाटचाल दिमाखात सुरू आहे. असे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वर्षामध्ये म्हैस दूध खरेदी करता ४ रुपये गाय दूध खरेदी करतात ३ रुपयांनी वाढ केलेली आहे. यात दूध उत्पादकांचा फायदा आहे.
सत्ताही मिरवण्यासाठी तर स्वहितासाठी नको तर दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या संसाराला मदत व्हावी, त्यांच्या कष्टाला, घामाला योग्य तो दाम मिळावा या उद्देशाने आम्ही सत्तेवर आलो आहोत. वीस लाख लिटरचा टप्पा गाठणे हे आमच्या समोर मोठे आव्हान आहे. यासाठी कर्ज वाटप होणे आवश्यक आहे. जिल्हा बँक यात मदत करायला सदैव तयार आहे. मुंबई हे मोठे मार्केट आहे. उन्हाळ्यात जनावरांवर परिणाम झाला. त्यामुळे याचा परिणाम दूध संकलनावर झाला. परंतु पाच जिल्ह्यांमध्ये अमूलला ही मागे टाकून गोकुळ हा ब्रँड विकसित कसा करता येईल. व गोकुळ हे देशात एक नंबर कसे होईल याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके,शशिकांत पाटील, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरीशसिंह घाटगे,तज्ञ संचालक युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!