कोल्हापूरकरांच्या मनोरंजनासाठी कोल्हापुरात सुपर स्टार सर्कस

 

कोल्हापूर/प्रतिनिधी: आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी शहरात १ मे पासून  सुपर स्टार सर्कस सुरू होत आहे. सोमवारपासून रोज दुपारी एक, चार आणि सात वाजता असे तीन खेळ होतील. नागाळा पार्कात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एस्तेर पॅटर्न हायस्कूलच्या मैदानावर पुढील ४० दिवस सर्कस राहणार आहे, अशी माहिती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.श्री. माने म्हणाले, ‘‘शाळांना सुटी पडली आहे. मुलांसह मोठ्यांचे मनोरंजन करण्यासाठी दोन वर्षांचा कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर पहिल्यांदाच सर्कस आली आहे. माझी तिसरी पिढी सर्कस चालवते.सर्कस चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमी तयार असतो.सर्कसमध्ये दोन तास भरपूर मनोरंजनाचे खेळ आणि शारीरिक कसरती आहेत. नेपाळ, आसाम, बिहार, केरळ, महाराष्ट्रातील ७० कलाकार आहेत. दोन रशियन कलाकारांचाही सहभाग आहे. त्यामध्ये २५ महिला कलाकारांचा समावेश आहे. तर ५ विदूषकांच्या करामती आपल्याला पोट धरून हसायला लावणार आहे. २ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. यात विविध चित्तवेधक खेळ, अकर्षक नृत्ये, मौत का कुआ यांसह विविध आर्कषण या सर्कसमध्ये असणार आहे.’तरी बालचमूसह अधिकाधिक लोकांनी सर्कस बघावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!