
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिलेली विचारांची शिदोरी आजही शिवसैनिकांकडून जपली जात आहे. ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाचा मूलमंत्र शिवसैनिकांकडून तंतोतंत पाळला जातो. संजय गांधी निराधार योजनेचे मा.अध्यक्ष किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना विभाग शुक्रवार पेठ व उत्तरेश्वर पेठ यांच्यावतीने आयोजीत केलेले सामाजिक उपक्रम स्तुत्य असून, “शिवसेवा मास” या उपक्रमातून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले मूलमंत्र आचरणात आणले जात असल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. संजय गांधी निराधार योजनेचे मा.अध्यक्ष किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना विभाग शुक्रवार पेठ व उत्तरेश्वर पेठ यांच्यावतीने वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत “१९ मे ते १९ जून” दरम्यान शिवसेवा मास या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण, ई-श्रम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती मोबाईल लिंकिंग, वाहन परवाना शिबीर, रेशनकार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, संजय गांधी निराधार योजना शिबीर व २००० मोफत अर्जांचे वाटप, जेष्ठ नागरिक सवलत कार्ड, विविध महामंडळाच्या योजनांची शिबिरे यात आयोजित करण्यात आली आहेत. यासह जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, लहान मुलांसाठी ऐतिहासिक चित्रपटाचां शो, धर्मवीर चित्रपटाचा शो, शिवसेना शाखांची उद्घाटने आदी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या “शिवसेवा मास” उपक्रमाचा शुभारंभ आज संजय गांधी निराधार योजनेचे मा.अध्यक्ष किशोर घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे मा.अध्यक्ष किशोर घाटगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यासह या सामाजिक उपक्रमांचा लाभ समाजातील सर्व घटकांनी घ्यावा असे आवाहनही श्री.क्षीरसागर यांनी केले. यानंतर या उपक्रमाअंतर्गत श्री उत्तरेश्वर थाळी व कोल्हापुरी थाळी येथे गरजूंना मोफत जेवण वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उत्तरेश्वर वाघाची तालीम अध्यक्ष दिपक काटकर, सुभाष कदम, मनोज घाटगे, युवराज तोडकर, रियाज बागवान, किरण मांगुरे, अरुण सावंत, सुरेश कदम, बंटी रावळ, सनी अतिग्रे, राकेश पोवार, किशोर खोत, अनंत पाटील, प्रदीप कोंडेकर, गणेश धनवडे, दीपक लिंगम, सुदर्शन सावंत, इंद्रजीत सावंत, अमर जाधव, निलेश हंकारे आदी शिवसेना पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply