
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वसगडे येथील 14 लाख रुपयांतून बांधण्यात आलेल्या माता रमाई सांस्कृतिक हॉल लोकार्पण व गावचावडी कार्यालय बांधणे, गावाअंतर्गत रस्ते डांबरीकरण, पाणंद रस्ते खडीकरण करणे अशा एकूण सुमारे रु. 38 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री . सतेज डी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वसगडे गावातील नागरिक माता रमाई सांस्कृतिक हॉलची मागणी करत होते, आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेली गावचावडीची सुसज्ज इमारत सुद्धा लवकरच पूर्ण होऊन ग्रामस्थांच्या सेवेसाठी सज्ज होईल. २०१९ साली दक्षिण मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने मला जी काम करण्याची संधी दिली आहे त्या संधीच मी नक्कीच सोन करेन, अशी ग्वाही यावेळी दिली.हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन दक्षिण मतदासंघातील ग्रामपंचायतींनी सुद्धा असा निर्णय घेऊन राज्यासमोर आणि देशासमोर एक आदर्श घालून द्यावा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दक्षिण मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Leave a Reply