गोकुळ ग्रामीण पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील चुयेकर बिनविरोध 

 

कोल्‍हापूरः  कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत मा.शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर ‘ यांची व्हा.चेअरमनपदी आय.ए.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी नूतन संचालकांचा सत्कार गोकुळ दूध संघाचे चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते करण्यात आला व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला व  शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाग्यश्री भांडारकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!