जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळली आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. संभाव्य पूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेच. पण, प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, संभाव्य पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे, प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनास दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त भागाचा श्री.राजेश क्षीरसागर यांनी दौरा करीत पाहणी केली.
श्री.राजेश क्षीरसागर यांनी सकाळी चिखली, आंबेवाडी या गावातून पाहणीस सुरवात केली. याठिकाणी नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन केले. प्रशासनानेही नागरिकांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर श्री.राजेश क्षीरसागर यांनी शहरातील पंचगंगा तालीम परिसर, जुना बुधवार तालीम, सिद्धार्थनगर, हरिओम नगर, बापट कॅम्प आदी भागाचीही पाहणी केली. यावेळी उपस्थित कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ठिकठिकाणी औषध फवारणी, वैद्यकीय शिबीर, स्थलांतर केलेल्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उभारण्याच्या सूचना दिल्या. यासह नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, किशोर घाटगे, इंद्रजीत आडगुळे, अमर क्षीरसागर, निलेश हंकारे, सनी अतिग्रे, नरेंद्र काळे, निलेश हंकारे, रियाज बागवान, अर्जुन आंबी, शैलेश कुंभार, प्रशांत नलवडे यांच्यासह जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!