
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’अशी ओळख निर्माण केली आहे.रोगावरील अचूक निदानासाठी अत्याधुनिक एम.आर.आय. व फिलिप्स अझ्युरीऑन मशीन हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रांगणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, तरी नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले.यावेळी बोलताना डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, ‘पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच* सर्वात अत्याधुनिक फंक्शनल एम.आर.आय. मशीनमुळे वेगवेगळ्या चाचण्या सर्वात वेगवान होणार असून सदर मशीन हे अत्यंत कमी आवाजात काम करते त्यामुळे रुग्णांना त्रास कमी होतो. तसेच फंक्शनल एम.आर.आय. मशीनद्वारे स्पेक्ट्रोस्कोपी, ३ डी ट्रक्ट्रोग्राफी तसेच लहान मुलांच्या व प्रौढांच्या पूर्ण शरीराच्या स्कॅनिंग अतिशय वेगवान होणार असून अचूक निदान करण्यास त्याची मदत होणार आहे. याशिवाय शरीरातील विविध सांध्यांच्याकरिता विविध प्रकारच्या कॉईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. एम.आर.आय.सेवा रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार इतरत्र असणाऱ्या सध्याच्या प्रास्ताविक दरापेक्षा ४० टक्के कमी दरात २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये अत्यंत सुसज्ज असा हृदयरोग विभाग असून कोल्हापुरात फिलिप्स अझ्युरीऑन मशीन दाखल झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सुसज्ज अशी कॅथ-लॅब असा लौकिक मिळाला आहे. या मशीनमुळे अधिक अचूकपणे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, लहान मुलांच्यातील रोग निदान व उपचार, इलेक्ट्रोफ़िजिओलॉजी, पेस मेकर, मेंदूतील रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग निदान व उपचार, तसेच शरीरातील रक्तवाहिन्यांच्या संबंधी निदान व उपचार करण्यास सहाय्यता होणार आहे. सिद्धगिरी हृदयरोग विभागातर्फे आतापर्यंत हजारो रुग्णांची मोफत तज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, ई.सी.जी. करण्यात आली असून सध्या हि हे तंत्रज्ञान मोफत सेवा देत आहे.या नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांना अधिक चांगली सेवा मोफत व माफक दारात मिळणार असून रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.’
तसेच डॉ.संदीप पाटील म्हणाले, ‘सिद्धगिरी मठ येथे फेब्रुवारी मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम’ महोत्सवाचे कोल्हापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवार दिनांक १५ जानेवारी २३ रोजी सायं ५ वाजता टाकाळा येथे होणार असून त्याच वेळी चंद्रकांत पाटील व पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत होणार आहे.तसेच या महोत्सवासाठी आता राज्य शासनाचे विविध विभाग हि गतिशील झाले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सिद्धगिरी मठावर सुरु आहे. अनेक राज्यातून या उत्सावाच्या तयारीसाठी स्वयंसेवक येत असून समाजातील तरुण व विविध समाजसेवी संस्थांनी पुढाकार वाढवला पाहिजे’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.पत्रकार परिषदेत विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजेश डाके, विधिज्ञ जे.एम.शिंदे, धनंजय जाधव,राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अभिजित चौगले यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply