
कोल्हापूर: सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.डी. वाय.पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापुरातील शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड कार्यक्रम आज संपन्न झाला.कोल्हापुरातील शिक्षण संस्थांमधील प्रत्येक शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ही मेरिट स्कॉलरशिप देण्यात आली. यावर्षी 66 विद्यार्थी या मेरिट स्कॉलरशिप अवॉर्डचे मानकरी ठरले. या माध्यमातून या विद्यार्थ्यांची या शैक्षणिक वर्षातील फी माफ केली जाणार आहे. व इथून पुढे दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील( भैया) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शिक्षण ही आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, याची शिकवण आम्हाला आमच्या आईंकडून मिळाली. आम्हा सर्व बहीण-भावांच्या यशस्वी वाटचालीत आईंचा फार मोठा वाटा आहे. डॉ. डी .वाय. पाटील यांच्या आशीर्वादासोबत आईंच्या खंबीर पाठबळामुळे आम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलो आहोत. आयुष्यातले सर्व चढउतार सहन करण्याची शिकवण आईंनी आम्हांला दिली. असे उद्गार आ.सतेज पाटील यांनी काढले.
स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून भविष्यात एकतरी विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
आईंच्या कष्टामुळे जीवनाला आकार मिळाल्याची कृतज्ञ भावना डॉ. संजय भैय्यांनी यावेळी व्यक्त केली.
या समारंभात प्रमुख पाहुण्या आमची बहीण डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सतेज पाटील. संजय पाटील यांच्या लहानपणाच्या काळातील प्रसंग मोकळेपणाने मांडताना सांगितलेल्या आठवणींमुळे सर्वांचे डोळे पाणावले.
बालकल्याण संकुल उपाध्यक्ष उद्योग उद्योजक व्हि.बी पाटील (काका) यांनी आजपर्यंत डॉ.संजय पाटील यांनी मोफत शिक्षण दिल्यामुळे बालकल्याण संकुलातील 9 विद्यार्थी इंजिनिअर झाले असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अँड रिसर्च फौडेशन पुणेच्या उपाध्यक्षा सुप्रिया चव्हाण-पाटील व डी. वाय. पाटील अकॅडमी शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला मेघराज काकडे, सौ. वैजयंती पाटील -वहिनी, देवराज पाटील, पुरुषोत्तम जगताप, अजितराव पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, करण काकडे, सौ.स्मिता जाधव, सौ.पूजा पाटील, सौ. वृषाली पाटील, चैत्राली काकडे तसेच कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साठम, प्रा.प्रवीण उके यांच्यासह पाटील कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य, स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
Leave a Reply