
कागल:कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ होते. यावेळी विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कागल शहराचा झालेला विकास पाहून अजित पवार भारावून गेले. आमदार हसन मुश्रीफानी कागलमध्ये विकासाच वैभव निर्माण केले, असे ते म्हणाले.
कागल शहरातील श्रमिक वसाहत येथील ७५ लाख निधीतून राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या नावाने असलेल्या बगीचाचे लोकार्पण, कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज ( बाळ महाराज) यांच्या कागल बस स्टॅन्डजवळच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व निपाणीवेस येथील श्री. राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह गोकूळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर , मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सुनील माने, रणजीत बन्ने, सौरभ पाटील, अरुण पाटील, अस्लम मुजावर, संदीप भुरले, दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, अर्जून नाईक आदी प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply