
कोल्हापूर:सभासदांच्या हितासाठी राजाराम कारखान्यांमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या पाठीशी राहून सत्तांतर घडवूया असे आवाहन गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले. शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे आयोजित प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते.राजाराम कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या संपर्क मेळाव्याना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आ. सतेज पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यातील शाहुवाडी, पेरीड, कडवे, कोळगाव, सोनवडे गावातील सभासदांशी संवाद साधला. कडवे येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना कर्णसिंह गायकवाड म्हणाले, राजाराम कारखान्याची ही लढाई परिवर्तनासाठी आहे. सभासदाना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी तालुक्यातील सभासदांनी ठामपणे उभे राहून राजाराम कारखान्यातील मक्तेदारी मोडून काढूया.आमदार सतेज पाटील म्हणाले, राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा वापरून याठिकाणचा ऊस बेडकिहाळ येथील स्वतःच्या खासगी कारखान्याला नेला जातोय. ही प्रवृत्ती राजाराम साखर कारखाना गिळंकृत करू पाहत आहे. या घातक प्रवृत्तीला रोखण्यासाठी या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांनी आता भाकरी परतण्याची गरज असल्याचे सांगितले.शाहूवाडी पंचायत समितीचे सदस्य अमरसिंह खोत, उमेश कामेरकर, अंजिनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष राजू भोपळे यांनी गेल्या चार-पाच वर्षात कडवे परीसरातील एक टन ऊस देखील या कारखान्याने नेला नसल्याचे सांगितले.यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शिवाजी ढोणे पाटील, विजय खोत, विकास बेंडखळे, रणजीत बागडे, संभाजी खोत, उदयसिंह खोत, इमरान तरटे, मानसिंग खोत, सुधाकर पाटील, सुहास पाटील, विनायक कुंभार, सुभाषराव इनामदार, साजिद शेख, पांडुरंग पाटील, राजाराम पाटील, पंडितराव नलवडे, बाळासाहेब गद्रे, प्रशांत पाटील, शंकर पाटील, महादेव पाटील यांच्यासह कडवे परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply