
कोल्हापूर: राजाराम कारखान्याच्या २९ सभासदांना अपात्र ठरविण्यात आले याबाबत आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. महाडिक भ्याले. ते रडीचा डाव खेळत आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव आणून हा निकाल लावण्यात आला आहे.निकालाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठेवणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. कारखान्यांमध्ये सभासदांना जाण्याचा हक्क नाही. अमल महाडिक हे कारखान्याचे खाजगीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमची लढाई ही कारखान्याच्या खाजगीकरणा विरोधात आहे. सभासद हेच कारखान्याचे खरे मालक आहेत. आमचे पॅनेल दोन दिवसातच जाहीर होणार आहे. जर ही निवडणूक खरोखरच लढवय्या प्रवृत्तीने लढवायची असती तर त्यांनी आमचे २९ सभासद अपात्र ठरवले नसते. खरोखरच महाडिक भ्याले असल्यामुळे त्यांनी हा रडीचा डाव खेळला आहे. एवढ्या वर्षात कधीही बाहेर न पडलेले महाडिक आता सभासदांच्या दारोदारी प्रचारासाठी फिरत आहेत. याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे.
Leave a Reply