महाडिकांचा काटामारीचा खेळ रात्री बारानंतर : शामराव चौगले

 

कोल्हापूर:काटा तपासणीसाठी येणारे अधिकारी हे दिवसा येतात. पण महाडीकांचा काटामारीचा खेळ रात्री बारानंतर सुरु होतो. त्यामुळे काटा कोण तपासणार आणि बक्षीस कोणाला देणार? हे अमल महाडीकांनी जाहीर करावे अशी उपरोधिक टीका राजाराम कारखान्याचे ज्येष्ठ सभासद शामराव चौगले यांनी केली. राजर्षि छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने सोन्याची शिरोली येथे झालेल्या सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौगले पुढे म्हणाले, आजपर्यत महाडीकानी कोट्यवधी रुपये लुटले आणि लाखाचे बक्षीस द्यायची भाषा बोलत आहेत. आमच्या भागातील उसाला भोगावती कारखान्यात जास्त रिकव्हरी मिळते. मात्र हाच उस राजारामला आणल्यावर दीडने रिकव्हरी कमी कशी होते? जिल्ह्यातील इतर कारखान्याचे दर वाढत असताना राजारामचा दर कमी कसा होतो? आजपर्यंत कोट्यवधीला लुटणारया महाडीकानी या निवडणुकीत पोराला पुढं केलय. पण सभासद मात्र महाडीकांचा कावा ओळखून आहेत. आता सभासदच त्यांना धडा शिकवतील.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे. सभासदांना न्याय देण्यासाठी ही लढाई आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा असून तो सहकारीच रहावा यासाठीचा हा लढा आहे. सभासदांनीच आता कारखान्यात परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला आहे.राजाराम निउंगरे यांनी छत्रपती राजाराम साखर कारखान्यातील अन्यायी कारभाराचा पाढा वाचला.
भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील, बाजीराव चौगले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हरीअण्णा चौगले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग भांदीगरे, आर .के. मोरे, मोहन पाटील, आर .डी. निऊंगरे, राजेंद्र मोरे, ज्ञानदेव पाटील, संजय माळकर, दिगंबर मेडसिंगे, राजू पाटील,जीवन पाटील, मोहन कांबळे, दिनकर पाटील, संजय पारकर, शांताराम पाटील, शिवाजी पाटील, अजित पाटील, बाबूराव चौगले, जीवबा कांबळे, दत्तात्रय पाटील, बाजीराव चौगले, चंद्रकांत चौगले यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!