
कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना आज बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात बालगोपाल विरुद्ध पॅक्टीस क्लब १-० ने पराभव करून, उपांत्य फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याची सुरुवात आता महासंघाचे वसंतराव मुळीक नाना, तोफिक मुलाणी, विकी महाडिक, संभाजी देवणे, रवी आवळे, अभिषेक देवणे, कुणाल शिंदे, राजेंद्र कुरणे, अशोक पवार, युवराज गायकवाड, रिची फर्नांडिस, बाळू पाटील, राहुल चव्हाण, अशोक पाटील, प्रताप जाधव, प्रसाद जाधव, चंद्रकांत चिले, नितीन सावंत, शिवाजीराव डवंग, उदय करपे, बापूसो साळुंखे, स्वप्नील पार्टे, मदन चोडणकर, किशोरी यादव, बाबुराव चव्हाण, बाजीराव मंडलिक, राजू लोंढे, संतोष पाटील, विजय पाटील, एस.एस.पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत साळोखे, आदिल फरास यांच्या प्रमुख उपस्थित झाली.बालगोपाल विरुद्ध पॅक्टीस क्लब यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात ९ व्या मिनिटाला व्हिक्टर निक्वे यांने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत बालगोपालने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात १-० अशी आघाडी कायम ठेवत, बालगोपालने पॅक्टीस क्लबचा १-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बालगोपालच्या परमजीत बगेल यांची निवड झाली. नितीन सावंत, संभाजीराव पाटील मांगोरे यांच्या हस्ते सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला बक्षीस देण्यात आले.
Leave a Reply