दुर्गम वस्त्यावरील ५१ गरीब कुटुंबाची घरे सौर उर्जेने उजळली

 

पिढ्यानपिढ्या अंधार आणि अठरा विश्व दारिद्र असलेल्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील दुर्गम वाडीवस्तीवर अतिशय हलाखीत जीवन जगणाऱ्या ५१ गोरगरीब कुटुंबाची घरे सौर उर्जेच्या प्रकाशाने उजळली आहेत. माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त या कॉनसॉफ्ट कंपनीचे विनय जोशी यांनी ही भेट देऊन कुटुंबाच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश आणला आहे.चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील वाडीवस्तीवर अजूनही लाईट पोहचलेली नाही. त्यामुळ अंधारात असलेल्या अनेक कुटुंबांच्या घरात आजही प्रकाशासाठी ‘चिमणी’ वापरली जाते. ‘चिमणी’ म्हणजे रॉकेलवरचा दिवा. कपड्याची अथवा सुतळीची वात करून रॉकेलच्या सहायाने दिवा पेटवला जातो. पण सध्या रॉकेलही मिळत नाही आणि महागाईने डीझेल परवडंत नाही… अशा कात्रीत सापडलेल्या या ५१ कुटुंबांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्याचे काम कॉनसॉफ्ट कंपनीचे विनय जोशी यानी केले आहे. विधानपरिषदेतील कॉंग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही अनोखी भेट दिली आहे. ‘सतेज उर्जा’ च्या माध्यमातून ५ वॅटचे ३ बल्ब, ६००० एमएएचची बॅटरी, १० वॅटचे सौर पॅनेल या ५१ कुटुंबांच्या घरी जोडण्यात आले आहे.यातील प्रत्येक बल्ब हा ३ मोड मध्ये कार्य करतो. सामान्य मोडमध्ये सलग २० तास, मध्यम मोड मध्ये सलग १२ तास, हाय मोडमध्ये सलग ९ तास हे बल्ब काम करतात.समाजातील गोरगरीब लोक, गरजवंत यांच्या मदतीसाठी आमदार सतेज पाटील हे सतत प्रयत्नशील असतात. विविध अडचणीवर मार्ग काढून, ती समस्या सोडविण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील अनेक कुटुंबाना वन क्षेत्रातील मान्यता, जागेच्या आणि कागदोपत्री गोष्टी आदी अडचणीमुळे अजूनही लाईट मिळू शकली नाही. यावर नवीन पर्याय शोधत आमदार सतेज पाटील यांनी निंगुडगे, गजरगाव, हारूर, हंदेवाडी यासारख्या अनेक गावातील ५१ कुटुंबांची घरे ‘सतेज उर्जा’च्या माध्यमातून प्रकाशमय केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!