
कोल्हापूर:डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत”च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.”नवभारत”च्यावतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो. यावर्षी मुंबईतील राजभवन येथे बुधवारी झालेल्या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘एक्सलंस इन सी.एस.आर. अॅक्टीव्हीटी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील उपस्थित होत्या.
Leave a Reply