परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनास कोल्हापूर येथेच बाजापेठ मिळावी व प्रजा सुखी व समृद्ध व्हावी, या उदात्त हेतून राजर्षि शाहू महाराज यांनी सन १८९५ साली गुळ बाजारपेठेची स्थापना केली. कालांतराने यास कोल्हापूर संस्थानने मार्केट कायदा लागू केला. सद्या राज्य शासनाच्या कृषी व पणन विभागाअंतर्गत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णया सोबत समितीचे काम शेतकरी, व्यापारी बांधवांच्या उन्नतीसाठी होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात ही समिती शेतकरी, व्यापारी यांच्या प्रश्नापेक्षा इतर कारणांनीच चर्चेचा विषय बनत चालली आहे. यामुळे उल्लेखनीय कामाअभावी समितीची प्रतिमा डागाळली जात आहे. शेतकरी, व्यापारी बांधवांना न्याय देवून शेती उत्पन्न बाजार समितीला उर्जितावस्था आणण्यासाठीच शिव-शाहू परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी, व्यापारी बांधवांना न्याय देण्यासाठी शिव – शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. शिव- शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे अडते व व्यापारी गटातील उमेदवार श्री.नंदकुमार वळंजू आणि श्री.अमर क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शहरातील धान्य व फळ व्यापाऱ्यांचा राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, गेली २८ व्यापारी, शेतकरी बांधवांचे नेतृत्व करणारे अनुभवी उमेदवार .नंदकुमार वळंजू, तर गेली १५ वर्षे व्यापारी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक आंदोलनात अग्रभागी असणारे श्री.अमर क्षीरसागर यांच्या रूपाने शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीने अनुभवी आणि लढवय्ये उमेदवार दिले आहेत. व्यापारी बांधवांवर लादलेल्या व्हॅट, जकात, एल.बी.टी., टोल अशा जाचक गोष्टींच्या विरोधात लढा देवून व्यापारी बांधवांना न्याय देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. यामध्ये या दोन्ही उमेदवारांनी हिरीरीरे सहभाग घेतला. प्रंसगी अंगावर आंदोलनाचे गुन्हे घेतले आहेत. पण, व्यापारी बांधवांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही, या उद्देशानेच या दोन्ही उमेदवारांनी आजपर्यंत काम केले आहे. व्यापारी बांधवांवर होणारी अरेरावी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. ज्यांनी बाजार समितीच्या आवारात टोल बसविला तेच आज टोल मुक्त करण्याची भाषा करत आहेत. आगामी काळात व्यापारी, शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी शिव-शाहू परिवर्तन आघाडी कटिबद्ध असेल. बाजार समितीतील एकही प्रश्न प्रलंबित ठेवणार नाही, अशी ग्वाही देत शिव- शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे अडते व व्यापारी गटातील उमेदवार .नंदकुमार वळंजू आणि .अमर क्षीरसागर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, परिवर्तन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील. शहरासह जिल्ह्यातील व्यापारी बांधवांना भेटून त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. मतदार याद्या पडताळून आपल्या संबधित व्यापारी बांधवांची भेट घ्यावी. परिवर्तन आघाडीची भूमिका समजावून सांगावी, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, मा.नगरसेवक .राहुल चव्हाण, उमेदवार अमर क्षीरसागर, श्री.आप्पासाहेब लाड, .सलीम बागवान आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.अंकुश निपाणीकर यांनी केले.यावेळी मा.स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे यांच्यासह किशोर तांदळे, विजय शेटे, मनोज नष्टे, किरण आर्दाळकर, खटावकर बंधू, शकील बागवान, बळवंत पटेल, संताजी जाधव, सुनील कापसे, नरेंद्र शहा, पियुष पटेल, उदय देसाई, रफिक बागवान, निमेश वेद, अमजद फरास, रशीद बागवान आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!