
कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): सूर्यकांता पाटील (९६), ओम चौगुले (९४). तिसऱ्या क्रमांकावर ९२ टक्के गुण मिळवलेले पाच विद्यार्थी आहेत, ते असे अमन देसाई, चंदना मिठारी, विवेक पाटील, प्रज्वल लंबे, तेहसिन शेख (९२). विद्या कौशिक, रोशना पाटील (९०). शाळेतील सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यसह पास झाले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका गीता पाटील, मुख्याध्यापिका मंजुळा जाधव यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष गणपतराव पाटील व प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
Leave a Reply