
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली पुलाची सांगली फाटा येथील ए. जी कोरगावकर पेट्रोल पंपास सन २०२२-२३ सालामध्ये उच्चांकी इंधनाची विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलिमच्या डीलर्सची बैठक नुकतीच येथील सयाजी हॉटेलमध्ये पार पडली . यावेळी बहुसंख्य डीलर्स उपस्थित होते. कोरगावकर पेट्रोल पंपास सलग ९ वर्षे हा पुरस्कार मिळत आहे. यावेळी पेट्रोल पंपाचे मालक आशिष कोरगावकर यांनी चोख व्यवस्थापन ,२४ तास ग्राहकांची सेवा , ग्राहक समाधान यांना प्राधान्य दिल्यानेच हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
संपूर्ण विभागात व जिल्हयात विश्वासार्हता प्राप्त केलेला कोरगावकर पेट्रोल पंप आज एक अथक परिश्रमाने लोकप्रिय ठरला असल्याचा सूर उपस्थितांतून उमटत होता.
पेट्रोल , पॉवर पेट्रोल , डिझेल व ऑइलच्या उच्चांकी विक्रीचे चार पुरस्कार कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रिन्स जिंदाल यांनी कोरगांवकर पेट्रोल पंपास प्रदान करून कोरगावकर कुटुंबीयांचा सन्मान केला.यावेळी कंपनीचे गोवा विभागीय व्यवस्थापक प्रिन्स जिंदाल, कोल्हापूर जिल्हा सेल्स मेनेजर आदित्य अग्रवाल व सांगली जिल्ह्याचे सेल्स मेनेजर श्री कैलास ,आशिष कोरगावकर, अनिकेत कोरगावकर , राज कोरगावकर ,ओम कोरगावकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply