
कोल्हापूर: येथील कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी चे प्राचार्य किरण पाटील यांना टेक महिंद्रा पुणे यांच्या कडून अमेझिंग टॅलेंट अवॉर्ड ने गौरविण्यात आले.कंपनी च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांना शैक्षणिक, सामाजिक पुरस्कार दिले जातात. यावर्षी प्रा.किरण पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्यात आला . पुणे येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात टेक महिंद्रा कंपनीचे सीईओ दिपक ठाकूर यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राजनंदिनी माने,अमेय माने ,पूजा पाटील यांचे सह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Leave a Reply