
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोणत्याही व्यवसायासमोरील प्रमुख आव्हान म्हणजे त्या व्यवसायातील ग्राहकांची गरज समजून घेणे आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन करायला शिकणे. सलून व्यवसाय इतर कोणत्याही व्यवसायाहून वेगळा नाही. फक्त नफा कमावण्यासाठी सलून व्यवसाय चालू करण्यापेक्षा ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती . सोमन्स रॉयल इमेजेस या पार्लरचे संचालक सोमण गवळी, संचालिका सुरेखा गवळी, सिद्धांत गवळी यांनी पत्रकार परिषदेत केले .
प्राचीन काळी लोक आपली त्वचा सुंदर करण्यासाठी हळद, चंदन, मुलतानी माती आणि दूध वापरत असत. सध्याच्या वाढत्या ग्लोबल वार्मिंग मुळे महिलांच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारची डाग, मुरूम, तेलकटपणा दिसत असतो. परंतु सध्याच्या काळात वाढत्या ा तंत्रज्ञानामुळे आणि जागरूकतेमुळे जे सर्व काम कॉस्मेटिक वस्तूंशी संबंधित आहे, जसे की हेअर ट्रीटमेंट, फेशियल, मेकअप आणि चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कॉस्मेटिक उत्पादने वापरून बऱ्याचशा समस्यांवर मात करु शकतो. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त सजण्याची आवड असते. यासाठी आम्ही रॉयल इमेज हेअर ब्युटी, मेकअप सलून आणि अकॅडमीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महिला आणि मुलींचे सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी
हेअर ड्रेसिंग, फेशियल्स, बॉडी ट्रिटमेंटस, वेटलॉस ट्रिटमेंटस्, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, ब्रायडल मेकअप इत्यादी सुविधा देत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिगर कटिंग हा प्रकार कोणाकडे नव्हता तो आम्ही 1988- 89 पासून सुरू केला. मुंबईतोल अनुभवाच्या जोरावर इथे स्वतः चा व्यवसाय सुरू केला आणि मुंबई पुणे प्रमाणे या क्षेत्रातील नवनविन संकल्पना येथे राबवून कोल्हापूरकरांना याचा फायदा मिळवून देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच
गरजू व या क्षेत्रात आवड असलेल्या तरुण-तरुणींना महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही आमच्या शासनमान्य संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू मुला- मुलींसाठी १७५४, नारायणी दुसरा मजला सिलाई वर्ल्ड च्या शेजारी, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर येथे सुरू केले आहे.
तसेच महिलांच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही शासनमान्य बेसिक ब्युटी कोर्सेस चालू केले आहेत. आमची अकॅडमी गेली दोन वर्ष कार्यरत असून कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासनमान्य अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येते. ज्या महिलांना किंवा तरुण-तरुणींना हा कोर्स करावयाचा आहे त्यांनी वरील पत्त्यावर किंवा 9850128295/ 8355833151 / 9689087329/ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी केले.
Leave a Reply