
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत दरवर्षीप्रमाणे गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ सणानिमित्त ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात गाय-वासरांचे पूजन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते आणि संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज करण्यात आले. याप्रसंगी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले ‘दूध उत्पादक शेतकरी हाच गोकुळचा आत्मा आहे. त्यांचे हित जोपासणे हेच आमच्या कारभाराचे सूत्र आहे. गोकुळ हा आता महाराष्ट्रभर पोहोचतोय याची जाणीव आम्हा सगळ्यांनाच आहे. सहकार टिकला पाहिजे व सहकारी संस्था पुढे गेल्या पाहिजेत. गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या हिताच्या विविध योजना राबविल्या जात असून दूध उत्पादकांना अधिक दूध दर कसा देता येईल ही आमची कायमच भूमिका असणार आहे.भारतीय संस्कृतीचीही जपणूक व्हावी व यातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गोकुळ नेहमीच प्रयत्नशील असतो. महिला दूध उत्पादकांच्या हस्ते गाय वासराचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील –चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटी सहा.निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,नामदेव दवडते संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
Leave a Reply