
कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापुरातील उत्तर भारतीय नागरिकाकडून पंचगंगा घाटावर पवित्र छट पूजा करण्यात येणार आहे. रविवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पंचगंगा घाटावर नदीत मावळत्या सूर्याची पूजा करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी सकाळी ५.३० वाजता नदीच्या पाण्यात शुद्धी करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करून पूजा करण्यात येणार आहे. हजारो उत्तर भारतीय या पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. चार दिवस हे व्रत असते. कोल्हापूरमध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. यासाठी ही पुजा पंचगंगा नदी घाटावर करण्यात येणार आहे.
Leave a Reply