
कोल्हापूर: कोल्हापूरला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वास आणल्याबद्दल सर्वपक्षीय गौरव समिती तर्फे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित आमदार सतेज पाटील यांनी नागरी सत्कार कृतज्ञतापूर्वक स्विकारला.याप्रसंगी आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्यासह सर्व माजी महापौर, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत योजना पूर्णत्वास आणण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
गेली ४० वर्षे थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेक घटकांनी लढा दिला. २०१० साली ही योजना पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि सर्व कोल्हापूरकरांच्या सदिच्छांमुळे थेट पाईपलाईनचे आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. हा माझ्यासाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे. आपल्या सर्वांचे प्रेम, सदिच्छा व पाठिंबा सदैव पाठीशी राहू देत, हीच या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो. थेट पाईपलाईन वचनपूर्ती लोकसोहळा आयोजित करणाऱ्या सर्वपक्षीय गौरव समितीचे आभार. असे उद्गार आमदार सतेज पाटील यांनी यावेळी काढले.
Leave a Reply