दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना द्वितीय स्मृतिदिनी आदरांजली

 

कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना द्वितीय स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. त्यांचा द्वितीय स्मृतिदिन आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जाण्याने कोल्हापूरचे एक यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट फुटबॉलपटू, अभ्यासू राजकीय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून, अण्णांच्या निधनामुळे विधानसभेतील सहकारी व मार्गदर्शक हरपला असून त्यांची उणीव सातत्याने जाणवते असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.कोल्हापूर शहराचे विकासाचे व्हिजन असलेले दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची क्षणोक्षणी आठवण येत असल्याचे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.यावेळी विविध मान्यवरांनी आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी आमदार जयश्री जाधव, युवा उद्योजक व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस औद्योगिक सेलचे सचिव सत्यजित जाधव, प्रेमला जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, अस्मिता मोरे यांच्यासह सर्व जाधव कुटुंबीयांनी आण्णांना अभिवादन केले.माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसेना शहरप्रमुख सुनिल मोदी, भूपाल शेटे, अर्जुन माने, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, गोशीमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, उपाध्यक्ष स्वरूप कदम, कोल्हापूर उद्योग सोसायटीचे अध्यक्ष दिनेश बुधले, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर, सचिन शिरगावकर, उदय दुधाने, साजिद हुदली, संजय पाटील, आनंद माने, स्मॅकचे राजू पाटील, अतुल पाटील, सचिन पाटील, शिवराज जगदाळे, हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, दुर्गेश लिग्रंस, अजित कोठारी, किशोर कदम, संजय पाटील, देवेंद्र दिवाण, मोहन कुशीरे, अॅड. शाहू काटकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शाहीर राजू राऊत, शिक्षक नेते दादा लाड, मावळा ग्रुपचे उमेश पवार, कमलाकर जगदाळे, उदय फाळके, राजू कांबळे, संध्या घोटणे, तौफिक मुलाणी, विक्रम जरग, मधुकर रामाने, सोहम शिरसगावकर, यशवंत थोरात, समीर कुलकर्णी, काका पाटील, आपचे संदिप देसाई, विनायक फाळके, इंद्रजीत बोंद्रे, प्रताप जाधव, विक्रम जरग, राजाराम गायकवाड ,अश्फाक आजरेकर, बाबा पार्टे, प्रवीण केसरकर, दिग्विजय मगदूम, सचिन पाटील, प्रकाश पाटील, महेश उत्तुरे, प्रतिज्ञा उत्तुरे, सागर येवलुजे, अँड. बाबा इंदुलकर, अनिल घाडगे, संपत पाटील, हर्षजीत घाटगे, नेत्रदीप सरनोबत, विजय पाटील, नारायण भोसले, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!