कोल्हापुरातील व्यंकटेश क्लिनिकमध्ये ॲडव्हान्स डिजिटल रेडिओग्राफी युनिट

 

कोल्हापूर : राजारामपुरी सातवी गल्ली येथील व्यंकटेश क्लिनिकमध्ये ॲडव्हान्स डिजिटल रेडिओग्राफी युनिट रुग्णांच्या सेवेत नुकतेच रुजू झाल्याची माहिती डॉ. सुनील कुबेर, डॉ. अनिल पंडित आणि डॉ. राजेंद्र मेहता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, व्यंकटेश क्लिनिक हे डायग्नोस्टिक सेंटर गेली ३५ वर्षे ही सेवा अव्याहतपणे पुरवत आहे. उत्कृष्टता व नावीन्याचा ध्यास असलेल्या व्यंकटेश क्लिनिकने सन २००५ मध्ये कोल्हापुरातील पहिले कॉम्प्युटराइज्ड एक्स-रे टेक्नॉलॉजी मशीन सुरू केले. व्यंकटेश क्लिनिक उत्कृष्ट प्रतीचे एक्स-रे देण्यात अग्रगण्य आहे.काळाची गरज आणि अचूक रोगनिदानाची परंपरा जपत, स्वर्गीय डॉ. छोटालाल मेहता यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच नावाने डिसेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्रातील पहिले व देशातील चौथे असे ॲडव्हान्स डिजिटल रेडिओग्राफी युनिट ECO TRACK DRF मशीन आणले आहे.या मशीनमुळे एक्स-रे कॅसेटवर घेण्याऐवजी थेट मॉनिटरवर पाहता येतो. ज्यामुळे वेळेची बचत होते.यामध्ये ३० ते ४० सेकंदामध्ये शरीराचा कुठल्याही भागाचा एक्स-रे काढता येतो. त्याचबरोबर मानेपासून पाठीपर्यंत संपूर्ण मणका, खुब्यापासून टाचेपर्यंत दोन्ही पाय एकाच वेळी पाहता येतात. अत्यंत बारीक फ्रॅक्चर Ultra High Definition क्वालिटीमध्ये पाहता येतो.मशीनमध्ये कॅथलॅबप्रमाणे टेक्नोलॉजी असल्यामुळे, एक्स-रे प्रोसिजरची सिनेलूप रेकॉर्डिंग करून सीडी बनवता येते व रुग्णांना पेन ड्राईव्हवर देता येते. यामुळे डॉक्टरना रेकॉर्डिंग पाहून अचूक रोगनिदान व उपचार करण्यास मदत होते. यामधील सिनेलूप टेक्नॉलॉजीमुळे वारंवार प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. कमीत कमी रेडिएशन डोसमध्ये पूर्ण होते. याचा फायदा सर्वात जास्त लहान मुलांच्या तपासणीत होतो.व्यंकटेश क्लिनिकमध्ये गर्भवती महिलांसाठी सर्वात अद्ययावत लेट्स्ट टेक्नोलॉजीची 4D सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे. तसेच CT स्कॅन सेवादेखील उपलब्ध आहे.डॉ. सुनील कुबेर, डॉ. अनिल पंडित आणि डॉ. राजेंद्र मेहता या अनुभवी रेडिओलॉजिस्टची टीम व्यंकटेश क्लिनिक येथे अव्याहत सेवा पुरवत आहे. यावेळी अजित कोठारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!