
कोल्हापूर/ प्रतिनिधी: विन्स हॉस्पीटल हे कायमच तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडावीर राहीलेले आहे. विन्सने नेहमीच अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञान अवलंबवत रुग्णांची सुरक्षितता व त्यातून रुग्णांना मिळणारे फायदे सर्वोत्तम रहावेत यासाठी प्रयल केलेला आहे.आज विन्समध्ये जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान, जगातल्या सर्वात उत्तम न्यूरो सर्जरीच्या केंद्रांच्यासारख्या व तुल्यबळ स्वरूपाच्या आहेत. आणि त्या उपलब्ध आहेत. यामुळेच परदेशातून व सर्व भारतातून रुग्णांचा विन्सकडे येण्याचा ओघ आहे. तसेच विन्स जागतीक आरोग्याच्या नकाशावर पोहोचले आहे (World Health Tourism map) अतिअद्ययावत तंत्रज्ञान अवलंबण्यात विन्स हॉस्पीटल आघाडीवर व अग्रक्रमी आहे. तसेच अतिशय प्रगत तंत्रज्ञान व शक्तिशाली साधनांचा वापर करून न्यूरो सर्जरीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळेच मेंदू व मण्क्याच्या शस्त्रक्रिया कमीत कमी धोका निर्माण करून प्रभावीपणे करण्यात विन्सचा हातखंडा आहे.
बत्तीस वर्षापुर्वी १९९१ विन्सने मायक्रोसर्जरी कोल्हापूर परिसरात पहिल्यांदा सुरू केली.आजपर्यंत २८००० मायक्रोसर्जरी आणि न्यरो नेवीगेशन हे अद्यावत तंत्रज्ञान वापरून ५००० अधिक सर्जरी २००७ सालापासून केलेल्या आहेत.एनडोस्कोपिक सर्जरी साल २००० मध्ये सुरू करण्यात आली. आणि मेंदू व मणके या दोन्हीसाठी त्यांचा वापर करण्यात येत आहे.२०१९ सालापासून रोबोटीक आर्म सर्जरीज (Medtronic Autoguide) पण केल्या जात आहेत.
२०१९ साली IONM (Intra Operative Neurophysiology Monitoring) हे तंत्रज्ञान वापरून मेंदुतल्या पेशींचे व फायबर ट्रॅक्टस यांचे कार्य शस्त्रक्रियेदरम्यान मोजण्याची यंत्रप्रणाली देखील विन्स मध्ये उपलब्ध झाली. याचा वापर करून ऑपरेशनच्या दरम्यान मेंदूच्या विविध फायबरचे कार्य (Function) मोजता येऊ लागले. ज्याच्यामुळे त्या फायबर्सना होणारे ऑपरेशन दरम्यानचे नुकसान कमीत कमी करता येईल अशी खातरी निर्माण झाली.
आता विन्समध्ये एक नवे पर्व सुरू होत आहे. एक क्रांतीकारक, आश्चर्यकारक, औद्योगिक कलाविज्ञान उपलब्ध झाले आहे. ते म्हणजे त्रिमीतीय 3D 4K STORZ VITOM एक्झोस्कोप Exoscope (Tuttlingen, Germany) ही प्रणाली खाजगी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच भारतात आणि मुंबई, पुण्याच्या आधी कोल्हापूर मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. याला डिजीटल एक्झोस्कोप असे म्हटले जाते. हे एक नविन प्रकारचे विस्तृतीकरण तंत्र आहे. यामध्ये रोबोटीक आर्म जोडण्याची क्षमता ही आहे. पुर्वी मेंदू व मणक्याची ऑपरेशन मायक्रोस्कोप म्हणजे सुक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करून केली जायची. यामध्ये लेन्सेस मध्ये बघून ऑपरेशन केले जायचे. आता 3D एक्झोस्कोपच्या वापराने ऑपरेशन दरम्यानचे परिघीय दृश्य (peripheral view) अतिशय चांगल्या प्रकारे व स्वच्छपणे दिसू लागल्यामूळे ऑपरेशनच्या दरम्यान आजूबाजूच्या भागांना इजा होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झालेली आहे. ऑपरेशन दरम्यान 3D चष्मा घालून ५५ अवाढव्य इंचांच्या स्क्रीनकडे पाहून ऑपरेशन केले जाते.
Al Artificial Intelligence, कृत्रिम बुध्दिमत्ता या जग हादरवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून रक्तवाहीन्या व त्याच्या आतमधील रक्त, त्याचप्रमाणे मेंदूतील गाठी व आजूबाजूचे नॉर्मल ब्रेन यामधील अंतर अत्यंत स्पष्टपणे दाखवून व कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून दिसणाऱ्या प्रतिमेचे संवर्धन व सुधारणा करून कल्पनेच्या पलिकडे स्पष्ट करून दाखवण्याची क्षमता या तंत्रज्ञानानामध्ये आहे.याचे फायदे म्हणजे पूर्वी मायक्रोस्कोप लेन्सेसमधून खाली बघून ऑपरेशन केले जायचे. आता थ्रीडी चष्मा घालून स्कीनकडे पाहून मेंदू व मणक्याच्या शस्त्रकिया अत्यंत अचूकपणे केल्या जातात. याला इंग्रजीमध्ये synaptive टेक्नॉलॉजी असे म्हणतात. ही पेशंटसाठी अत्यंत सुरक्षित व कमी आक्रमक ठरते.ऑपरेशनच्या दरम्यान सर्जनला येणारा थकवा व लागणारे श्रम कमी होतात. त्यामुळे एकंदर कार्य क्षमता लांब ऑपरेशनच्या दरम्यान खूपच वाढते. पुर्वी मायक्रोस्कोप वापरून अतिशय छोट्याशा भागावर फोकस केलं जायच. पण आजुबाजूच्या गोष्टी तितक्या स्पष्ट दिसायच्या नाहीत. एक्झोस्कोप वापरून संपूर्ण ऑपरेशनचा भाग हा चांगल्या फोकसमध्ये राहतो. आजूबाजूच्या महत्त्वाच्या भागांना इजा होण्याची शक्यता यामूळे अतिशय कमी होते. त्याचप्रमाणे झूम करून जे मोठे करून पाहण्याची क्षमता आता या टेक्नॉलॉजीच्या वापरामूळे प्रचंड प्रमाणात आहे (२० पट). मेंदूतल्या ट्युमर, गाठी व इतर आजूबाजूच्या भागामधील जो फरक आहे तो अतिशय सुस्पष्ट दिसून येतो. त्याच्यामूळे त्या भागाला वाचवून हे ऑपरेशन सुरक्षितपणे करता येते. त्याचप्रमाणे ऑपरेशन दरम्यान होणारे प्रदीपन (illumination) अनेक पटीने वाढून ऑपरेशनचा सर्व भागाची अतिशय स्वच्छ प्रतिमा दिसून चांगल्या प्रकारे फोकसमध्ये येते. डोळयाला दिसणाऱ्या दृष्टीपेक्षा जवळजवळ १५ ते २० पटीने जास्त स्पष्ट असा ऑपरेशनचा भाग दिसतो. या तंत्रज्ञानाचा लर्निंग curve म्हणजे शिकण्याची वक्ररेषा सोपी आहे. विन्सने ती परदेशात ट्रेनिंग घेऊन आत्मसात केली आहे.मेंदूच्या गाठी, pituitary ग्रंथीतील गाठी, मेंदूच्या रक्तवाहिन्यावरील फुगे, जाळया AVM, मणक्यातील ट्युमर्स,मणक्यातील सरकलेल्या चकत्या Cervical disc, मुले व बालकांची न्यूरोसर्जरी, इत्यादी क्ल्प्टि शस्त्रक्रिया अत्यंत सहजपणे व बिनधोकपणे केल्या जाऊ शकतात. यामध्ये विलक्षण अचूकता निर्माण होऊन त्याचे फलित खूपच सुधारणार आहे.भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जागतीक पातळीवर हे तंत्रज्ञान केवळ २०२१ साली उपलब्ध झाले आहे.आनंद होतो की, विन्स हे भारतातील पहिले खाजगी हॉस्पीटल आहे. आणि महाराष्ट्रात पहिले हॉस्पीटल जेथे हे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे. आणि कोल्हापूर व बाजूच्या परिसरातील मेंदू व मणक्याच्या रूग्णांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती सुप्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ, विन्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संतोष प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पत्रकार परिषदेस डॉ. सुजाता प्रभू,डॉ. आकाश प्रभू,डॉ. डिओना प्रभू,डॉ. मृदुल भटजीवाले, डॉ. संदिप पाटील,डॉ. व्येंकट होळसंबरे, दामोदर घोलकर, धरणेंद्र मंडपे आदी उपस्थित होते.
Leave a Reply