
धर्मचक्र विधान महामहोत्सव सोहळा येत्या ५ ते १० जानेवारी दरम्यान
कोल्हापूर / प्रतिनिधी : श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर मानस्तंभ चतुर्मुख जिनबिंब प्रतिष्ठेच्या द्विद्वादश पुर्ती म्हणजेच २४ वर्षेनिमित्त श्री बृहत समवशरण स्थित धर्मचक्र विधान महा महोत्सव सोहळ्याचे आयोजन श्री १००८ चंद्रप्रभ दिगंबर जैन कासार मंदिर, कासार गल्ली कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष महावीर गरगटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंदिराचे अथवा मानस्तंभाचे पंचकल्याण महोत्सव झाल्यानंतर बारा वर्षांनी पूजा महोत्सव करण्याची प्रथा आहे.बारा वर्षानंतर एक तप पूर्ण होते. त्यामुळे नवीन पिढीमध्ये धर्माचे ज्ञान व धर्म प्रभावना मुनी महाराजांच्या दिव्य वाणीमधून व्हावी या उद्देशाने ही पूजा केली जाते. २०१२ साली मानस्तंभाचा द्वादशवर्षपूर्ती सोहळा संपन्न झाला. आता २०२४ रोजी २४ वर्षे पूर्ण झाली. म्हणून हा द्विद्वादश पूजा महोत्सव ५ जानेवारी ते १० जानेवारी या दरम्यान करण्यात येणार आहे. एकूण सहा दिवसाच्या या कार्यक्रमांमध्ये रोज सकाळी नऊ वाजता मिरवणूक निघणार आहे. तसेच चार जानेवारी रोजी सायंकाळी परमपूज्य मुनिश्री तत्त्वार्थनंदिजी महाराज आणि श्रमणनंदीजी महाराज यांचा मंगल प्रवेश होणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पत्रकार परिषदेला सुरेश मगदूम, उपाध्यक्ष अभिनंदन पोकळे, सचिव भवनेंद्र उपाध्ये, भरत वणकुद्रे, वर्धमान रुईकर, भरतेश संगरुळकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply