
कोल्हापूर : दागिने आणि महिलांचे अतूट नाते आहे. यासोबतच येते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या प्रसिद्ध ब्रँडचे नाव जे “सोनेरी क्षणांचे सोबती” म्हणून ओळखले जाते. वामन हरी पेठे ज्वेलर्सची स्थापना 1909 मध्ये मुंबईत झाली. आज वामन हरी पेठे ज्वेलर्स हा सोने आणि डायमंड ज्वेलरीमध्ये विश्वासार्ह ब्रँड आहे आणि विवेकी आणि सौंदर्याविषयी जागरूक सर्व वयोगटातील ग्राहकांना सेवा देतो. वामन हरी पेठे ज्वेलर्स त्यांच्या अप्रतिम आणि उत्कृष्टपणे तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखले जातात.114 वर्षांची अभिमानास्पद परंपरा जपत वामन हरी पेठे ज्वेलर्स ने त्यांच्या कोल्हापूर येथील शोरूम मध्ये डायमंड आणि पोलकी महोत्सवाचे आयोजन केले आहे. लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पार्टनर आशिष पेठे उपस्थित होते. हा महोत्सव 5 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. या उद्घाटनाचे निमित्त साधून वामन हरी पेठे ज्वेलर्स हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५० टक्के सूट मिळणार आहे आणि सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीवर एक चांदीचे नाणे मोफत मिळणार आहे.कोल्हापूर येथील शोरूम बी -२, अथर्व एम्पायर, अप्पर ग्राउंड फ्लोअर, २६३-ए/२-४, ई वॉर्ड, सासणे मैदान समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३ येथे आहे. अधिक माहिती करिता टेलि. -०२३१-२६६९८१४ / ८१०८१६९००८ या नंबर वर संपर्क करू शकता. वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हणजे केवळ दागिन्यांमध्येच नव्हे तर त्याच्या व्यवहारांमध्ये शुद्धता, शुद्ध विश्वास, नाविन्यपूर्ण डिझाइन्स, उत्कृष्ट दर्जा, कलाकुसर आणि डिस्प्लेवरील डिझाईन्सचे उत्कृष्ट फिनिशिंग यासाठी ओळखले जातात. वामन हरी पेठे ज्वेलर्स मध्ये आमच्या मूल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभव देण्याचा आम्हाला अभिमान आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स हे आमच्या ग्राहकांच्या सर्व दागिन्यांच्या गरजांसाठी एक स्टॉप शॉप आहे. अशी माहिती वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर आशिष पेठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उद्घाटन प्रसंगी अमृता खानविलकर म्हणाल्या, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात आपल्याला सगळ्या गोष्ठी एकाच छताखाली हव्या असतात वामन हरी पेठे ज्वेलर्सने आयोजित केलेला हा पोलकी महोत्सव त्याचेच प्रतिबिंब आहे. देशभरातुन वेगवेगळ्या कारागिरांनी बनविलेल्या डिझाइन्स इथे पाहायला मिळणार आहेत.तरी सर्व कोल्हापूरकरच्या स्त्रियांना, या आणि या महोत्सवाचा लाभ घ्या. “असे आवाहन केले.वामन हरी पेठे ज्वेलर्सला नुकतेच डोमेस्टिक जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलने “मोस्ट प्रीफर्ड रिटेलर्स ऑफ इंडिया”म्हणून गौरविले आहे आणि रेडिओ सिटीद्वारे अलीकडेच 30 पॉवरलिस्टच्या 30 एलिटिस्ट पॉवर-पॅक्ड बिझनेसच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.सचोटीने वागणे, वस्तू, व्यवहार आणि वर्तनात शुद्धता, हे आमचे ब्रीदवाक्य आहे आणि या संकल्पनेवरच आमची संस्था इतकी वर्षे टिकून आहे. एखादा ग्राहक जेव्हा आनंदी असतो किंवा काहीतरी साजरे करत असतो तेव्हा आमच्याकडे येतो. आणि आम्ही भाग्यवान आहोत कि आमच्याकडे ग्राहक आनंदी होतो. जेव्हा प्रत्येक ग्राहकाच्या आयुष्यात सोनेरी क्षण येतात जसे लग्न, वाढदिवस, अनिव्हर्सरी, तेव्हा त्या दिवसाच्या आठवणींची एक साठवण म्हणून तो आमच्याकडून एक दागिना विकत घेतो, पण तेव्हा आम्ही त्याला वस्तू म्हणून विकत नाही तर, आम्ही त्यांच्या प्रत्येक सोनेरी क्षणाचे साथीदार असतो. आणि हीच आमच्या टॅगलाइन मागची धारणा आहे. आणि त्याचा खरा अर्थ आहे.वामन हरी पेठे ज्वेलर्स हे आश्चर्यकारक नवीनतम डिझाईन्स आणि सर्वोत्तम किमतींसाठी एक खात्रीचे ठिकाण आहे. परंपरा आणि आधुनिकतेचे परिपूर्ण मिश्रण असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स नवीन क्षितिजे गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत. असेही ते म्हणाले. यावेळी मेघना जाधव, निरंजन पेठे यांच्यासह कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते.
Leave a Reply