भीमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची असून लोट गर्दी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी उपयुक्त माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा कृषी प्रदर्शन २०२४* प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी अलोट गर्दी ही मेरी वेदर मैदानावर केली होती.प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून राष्ट्रपती पदक मिळविलेला,अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पानिपत येथील हरियाणा चॅम्पियन गोलू टू रेडा जगातील सर्वात मोठा हरियाणातील १० कोटीचा गोलू २ रेडा, अडीच फूट उंचीची गाय,१०० किलो वजनाचा वैताळ बिटल (मेल),फायटर कोंबडा,वाशी येथील ९५ किलोचा दीड वर्षाचा बिटल बकरा,७० किलो वजनाचा १ वर्ष २६ दिवसाचा कोहिनूर बिटल बकरा, लाल कंधारी म्हैस खास आकर्षण पाहण्यासाठी ठरत आहेत.मसाई पठार येथील सागर महाडिक यांच्या केदरलिंग गोशाळेतील सहा वर्षाचा कौंनक्रेज जातीचा सर्वसाधारण १२०० किलो लाडू नावाचा नंदी हा आकर्षण ठरत आहे.याचबरोबर गाय आणि बैल, पांढरा बैल, रावण नावाचा ६ फूट २ इंच लाल कंधारी वळू,नांदेड येथील बैल,साडेचार फूट लांब शिंग असलेली पंढरपुरी म्हैस खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर जाफराबादी गायी,हँगस्टर जातीचे पांढरे ससे,भीमा फार्म मधील ब्लॅक जॉक,सुलतान नावाचे घोडे,कडकनाथ कोंबड्या लव बर्ड आफ्रिकन फिशर,बर्ड,सेल,क्रोकोटल, पपेट,गिनिपिक चिनी कोंबड्या,बेकिंग बदक,घोडे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.याचबरोबर भीमा फार्म अँग्रोमधील पक्षी तर देशी आयुर्वेदिक शिवकालीन काळा ऊस,शंकेस्वरी दीड फूट लाल मिरची,खुपिरे येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरत आहे.देशी आणि विदेशी भाजीपाला ज्यात ढबू मिरची उदगावची केळी, व्हनूर नांदणी येथील देशी केळी,मुळा,,भेंडी,वांगी, पपई,हिरवा व लाल कोबी,निशिगंध फुल,घट्ट गुलाब फुल लांब देठ असलेले गुलाब फुल,यावर्षीचे प्रदर्शनाचे १५ वर्ष असून चारशे हून अधिक देश विदेशातील विविध कंपन्यांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक महिला बचत गटाचा सहभाग, एकूण २०० जनावरे अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, शेततळे,गोपीनाथ मुंडे विमा योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी शेती करायची यासह कृषी विभागाच्या वतीने शेतीविषयक विविध मॉडेल प्रदर्शनात मांडलेले आहेत.याचबरोबर विहिरीचे मॉडेल ही मांडण्यात आले आहे.आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मेरी वेदर मैदानावर मोठी गर्दी केली आहे.प्रदर्शनात आजरा घनसाळ, काळा तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा,डाळी, कोकम, हळद आदी पहायला मिळत आहे. रेशीम कोष याची माहितीही पहावयास मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!