
कोल्हापूर : गीतांजली डोंबे जिद्द फौंडेशन अध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत.जिद्द फौंडेशन हे अशा लोकांच्यासाठी काम करते जे अगदी गोर गरीब आणि असाहाय्य आहेत. जिथे कोणी पोहचत नाही तिथं पहिला जिद्द फौंडेशन नी भेट दिली आहे.आतापर्यंत खूप लोकांना मदती केल्या आहेत. कोरोना काळात तसेच महापूर काळात तर शक्य तितक्या मदती केल्याचं आहेत.कुठे कोणाला खूप गरज आहे तिथपर्यंत आम्ही पोहचलो आहोत.कोरोनामध्ये कलाकार,वधू वर सूचक केंद्र तसेच अगदी गरजू लोक अशा लोकांना मदती केल्या आहेत.कोरोनामध्ये जेव्हा सगळी लोक घरात बसली होती तेव्हा गीतांजली डोंबे या अगदी स्वतःच्या जीवाची ही पर्वा न करता रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होत्या.।गीतांजली डोंबे यांचे जीवावर उदार होऊन काम बघून अनेक श्रीमंत लोक मदती देत होते. व त्या जाऊन गरीब व गरजू लोकांच्यापर्यंत पोहच करत असत. आणि आता पण काही अशी काही गरजू कुटुंब आहेत त्यांना नेहमी मदती पोहच करण्याचे काम हे गीतांजली डोंबे करत असतात.तर आता या मदती येतात कुठून.अशी काही लोक आहेत चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांना सांगितले किंवा ग्रुपवर टाकले की अश्या अश्या ठिकाणी मदत द्यायची आहे.तर गीतांजलीवर विश्वास असल्यामुळे लोक आणि तिच्या मैत्रिणी तिला मदत करण्यासाठी पुढे येतात. कारण त्यांना माहीत आहे की ही मदत योग्य ठिकाणी नक्की पोहचणार.असा विश्र्वास आहे.यावर्षी तर दाजीपूर अभयारण्य धनगरवाडा येथे दोन वयस्कर महिला राहतात.तिथे जाऊन मैत्रिणींच्या सहकार्याने जाऊन खूप मदत पोहच केली आहे.तसेच आंबेवाडी येथे खूप गरजू अशी दोन कुटुंब रहात आहेत. त्यांना पण मदत पोहच केली आहे.आणि एका महिलेच्या पतीला ब्रेन ट्युमर झाला असून त्यांची अर्थिक परीस्थिती खूप बिकट आहे. तर त्या महिलेला सोशल मीडियावर व्हिडीओ व फोटो व्हायरल करून खूप मदत आर्थिक स्वरूपात मिळवून दिली आहे.आणि मैत्रिणी आणि जोडलेली माणसे आहेत. त्यांच्याकडून पण जीवनावश्यक व आर्थिक दृष्ट्या अशी खूप मदत मिळवून दिली आहे.काही कुटूंब अशी आहेत की त्यांच्या घरी लहान मूल आहेत.त्यांच्या घरी जबाबदारी घेणारे कोणी नाही. अशा मुलांना शालेय वस्तू, कपडे अशा स्वरूपात मदती जिद्द फाऊंडेशने केली आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी पण त्यांची धडपड चालू असते.चित्रपट क्षेत्रांत चांगली ओळख असल्यामुळे खुप महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला आहे. त्यांना पुढे घेऊन जाण्याचे काम गीतांजली यांनी केलं आहे.शिवाय ज्या महिला किंवा पुरुष समाजात चांगले काम करतात अशा खूप लोकांचे गौरव जिद्द फौंडेशने केले आहेत.खूप लोकांची लग्न पण लावून लावून दिली आहेत.आणि ती यशस्वी झाली आहेत. मुलामुलींना ,महिलांना नोकरी मिळवून देण्यासाठी धडपड चालू असते.मला नेहमी एकच वाटते की माझ्या देशातील महिला उपवाशी राहू नये.शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून गरीब घराण्यातील मुलाचे शिक्षण अपूर्ण राहू नये.आणि पैसे नाहीत म्हणून गरीब घराण्यातील लोक उपचारविना त्यांचा जीव जाऊ नये.मला जेवढे शक्य तितके समाज कार्य मी करत आले आहे. आणि करत राहील.त्यासाठी मला लोकांच्याकडून पण सहकार्य मिळाले पाहिजे. खूप अडचणीना मात करून सेवा भावी वृत्तीने मी जिद्द फौंडेशन उभे केले आहे.तर एक हात मदतीचा….नक्की जिद्द फौंडेशनवर विश्वास ठेवून सगळे मदत करतील अशी आपेक्षा आहे.आणि ती मदत योग्य त्या ठिकाणी पोहचवायचे काम हे जिद्द फौंडेशन करेल. मला माझे काम बघून मिळालेले पुरस्कार असे खूप पुरस्कार आहेत जे मला माझ्या कामामुळे मिळालेले आहेत. हीच लोकांनी दिलेल्या माझ्या कामाची पोचपावती आहे असे गीतांजली डोंबे यांनी कोल्हापूर 24 न्यूज शी बोलताना सांगितले.
Leave a Reply