
कोल्हापूर : येथे वास्तव्य करणाऱ्या आजरेकरांचा मेळावा रविवारी येथील गडकरी सभागृहात पार पडला. सुमारे तीन तास चालेल्या या मेळाव्यामध्ये मुळचे आजरेकर गावकडच्या आठवणींमध्ये रंगून गेल्याचे दिसून आले. आजरा तालुका रहिवासी संघाच्यावतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सुरूवातीला आमदार जयश्री जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष,‘गोकुळ.चे माजी अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये स्नेहमेळाव्याचा हेतू सांगितला. आजरा तालुक्यातून कोल्हापुरात येवून विविध क्षेत्रात उत्तम पध्दतीने कार्यरत असणाऱ्यांचे संघटन व्हावे यासाठी या संघाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, आजरेकरांचा कोल्हापुरात मेळावा ही कल्पनाच मला आनंद देवून गेली. आज इथे आल्यानंतर अनेक वडीलधारी मंडळी, गावातील गल्लीतील मैत्रिणी भेटल्या. या स्नेहमेळाव्यामुळे मनाला आनंद मिळाला. अनेक आठवणींना उजाळा मिळाला. चंद्रकांत जाधव यांच्याशी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने आजरेकरांना भेटता आले.रविंद्र आपटे म्हणाले, आजरा तालुका रहिवासी संघ गेली काही वर्षे अशा पध्दतीने मेळावे घेत आहे ही अनुकरणी बाब आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून आजरा तालुक्यातील दुग्ध व्यवसाच्या वाढीसाठी मला प्रयत्न करता आले याचे मोठे समाधान मला आहे. अशाच प्रकारे हे संघटन मोठे होत जाईल यात शंका नाही. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गनी आजरेकर, अथर्व शुगर्सचे चेअरमन मानसिंग खोराटे, मुळचे हात्तिवड्याचे असलेले माजी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. बाबुराव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या डॉ. जे. पी. नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे. गोरे क्लासेसचे गोरे, रमेश इंगवले, अमृत देसाई, चंद्रशेखर बटकडली, सुवर्णा काळे यांनी मनोगत व्यक्त केले. शुभदा कामत यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य जॉन डिसोझा यांनी आभार मानले. सौम्या तिरोडकर, महेश टोपले, शैलेश बांदेकर, महेंद्र कुरूंदकर, स्नेहम कामत, स्नेहल करंडे, ईस्माईल पठाण यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाला कोल्हापूरस्थित आजरेकरांनी मोठी गर्दी केली होती.
.
Leave a Reply