
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना यांच्यामार्फत जातिवंत दुधाळ गाय/ म्हैशीसाठी परिपूर्ण असलेले बी.आय.एस. टाईप १ चे नवीन प्रीमिअमचे ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ या नवीन पशुखाद्याचा व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ या उत्पादनाचा विक्री शुभारंभ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या शुभहस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या शुभारंभ प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला असून सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. गोकुळ सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवीन उपक्रम राबवत असते गोकुळच्या दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जातिवंत दुधाळ गाय/ जनावरांकरिता फायदेशीर असून खास करून परराज्यातील आणलेल्या जातिवंत म्हैशींसाठी उपयुक्त आहे .नवीन कोहिनूर डायमंड पशुखाद्य हे आकर्षक ५० किलो बँग मध्ये उपलब्ध आहे.तसेच जनावरांना वाळलेल्या वैरणीची कमतरता भासू नये, टी.एम.आर.वीट जनावरांना फोडून खाऊ घालताना महिला दूध उत्पादकांना अडचणी येऊ नयेत, म्हणून संघाने याचा विचार करून नवीन स्वरुपात महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश हे उत्पादन २५ किलो बँग मध्ये उपलब्ध केले आहे. यामध्ये प्रथिने १० ते ११ टक्के व फॅट १.५ टक्के असून जनावरांची रवंत प्रक्रिया सुधारून दूधवाढ व गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे.या बाबतची विस्तृत माहिती दुध संस्थान परिपत्रकाद्वारे कळवली असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांकरिता गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ या पशुखाद्याच्या उत्पादनाचा वापर करावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ.व्ही.डी.पाटील, दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply