
एखादा निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचार पूर्वक घेत असते. माझी उमेदवारी जाहीर करण्यामागे मी केलेले काम बोलते. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. आम्हाला न्याय देणारी ही माणस आहेत असा माझ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. शाहू महाराजांच्या या पुरोगामी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना बरोबर घेऊन जाणारे आमचे माने कुटुंब आहे. तीन पिढ्यांपासून ही वाट धरली आहे. येणारा काळात सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी जनता मला निवडून देइल. मयूर दूध संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचे माझ्या बद्दल काही गैरसमज असतील तर ते मी दूर करीन. उमेदवार बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहे. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मांडत मी लोकसभेपर्यंत गेलो आहे. समोरच्या उमेदवाराला अजूनही पक्ष सापडत नाही त्यांचे वैचारिक घालमेल सुरू आहे. अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. आमचा विजन क्लियर आहे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे व्हिजन देखील क्लियर आहे. देशाला पुढे नेणारे नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे आहे. भाजप कार्यकर्त्यांबरोबर कोणतीही नाराजी नाही. सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर काम करतील. धर येशील माने आणि मोदी यांना घराघरापर्यंत पोहोचवतील. स्वाभिमानी च्या नावाखाली आत्मकेंद्रित राजकारण त्यांचे सुरू आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने स्वाभिमानी वागावे लागते. एका भूमिकेशी कधी ठाम नाही. दाखवायचे दात आणि खायचे दात त्यांचे वेगळे आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचा उमेदवार बदलला जाणार नाही. असे खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकारांचे बोलताना सांगितले.
Leave a Reply