रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत भरतनाट्यम कार्यक्रम

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : १६ एप्रिल २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने “मुद्रा ए कल्चरल इनिशेटीव्ह” अंतर्गत पुण्यह डान्स कंपनीज प्रस्तुत “संजीवनी” या ९० मिनिटाच्या भरतनाट्यम कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे अशी माहिती प्रेसिडेंट रो.कल्पना घाटगे,सेक्रेटरी शोभा तावडे, ट्रेजरर ममता झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.रोटरी क्लब ने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या १६ एप्रिल २०२४ रोजी हा ९० मिनिटांचा न थांबता भरतनाट्यमचे आदित्य पी.व्ही आणि पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या ग्रुपचे सादरीकरण कार्यक्रम होणार आहे.मेनन ड्रीवेन बाय टेक्नॉलॉजी याचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले आहे.या कार्यक्रमाचे पासेस चार दिवस आधीपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे उपलब्ध असणार आहेत तर महाजन पब्लिसिटी ९५६१६२६६६३ यांच्याकडेही पासेस मिळणार आहेत.रोटरी क्लब ऑफ गार्गिजने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कोरोनाच्या कालावधीतही सहकार्य केले आहे.आताही भरतनाट्यम उपक्रम राबविला जात आहे.या कार्यक्रमात एकूण ७ जण नृत्याविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. ज्यात राम आणि सीता,दीपावली,नृत्य संजीवनी,पुण्य कृष्ण,आदी शंकराचार्य,कृष्णलीला, नामसंजीवनी,भजन आणि श्रीराम यांच्यावर आधारित नृत्यांचा समावेश असणार आहे.असे कविता नायर यांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!