
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथेअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संघाच्या गोकुळ शॉपीचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते झाले. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते. चेअरमन अरुण डोंगळे यावेळी म्हणाले, गोकुळने आपल्या गुणवतेच्या जोरावरती आपल्या ग्राहकांना भुरळ घातली असून गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठया प्रमाणात मागणी आहे. कागल पंचतारांकित एम.आय.डी.सी. परिसरातील ग्राहक, कर्मचारी यांच्यासाठी गोकुळ दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला,पिस्ता,चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. गोकुळच्या दुध व दुग्धजन्य पदार्थ याची चव आवडेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, प्रकाश आडनाईक, पशुखाद्य व्यवस्थापक व्ही.डी.पाटील, मानसिंग देशमुख, बी.पी.पाटील, व्ही.टी.पाटील,मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, शॉपीचे मालक सचिन गोजारे, प्रथमेश सावंत, देवदत्त चौगले, अवधूत चौगले आदी उपस्थित होते.
Leave a Reply