युरोपियन “यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी ” कडून डॉ.शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन!

 

कोल्हापूर:मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासरगिल मायक्रोन्युरोसर्जिकल ॲकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांना भारतातून सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून प्रतिष्ठीत नामांकन मिळाले असून, त्यांना इस्तंबूल, तुर्की येथे होणाऱ्या ” यासरगिल मायक्रोन्युरोसर्जरी ” काँग्रेसमध्ये “वक्ता आणि प्राध्यापक” म्हणून विशेषाधिकाराने आमंत्रित करण्यात आले आहे.गाझी यासरगिल हे ९८ वर्षांचे दिग्गज न्यूरोसर्जन आणि आधुनिक मायक्रोन्युरोसर्जरीचे जनक म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांना भेटणे ही कोणत्याही न्यूरोसर्जनसाठी आयुष्यभराची उपलब्धी असते, अशा प्रतिष्ठित अकादमीमध्ये वक्ता म्हणून नामांकन मिळणे आणि आमंत्रित करणे ही एक गौरवाची बाब आहे. या विशेष अधिवेशनासाठी भारतातून निवडक अशा १० न्यूरोसर्जन यांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांची निवड गौरवास्पद आहे.डॉ.शिवशंकर मरजक्के यांच्या या सेवाभावी वृत्तीची दखल आतंरराष्ट्रीय स्तरावर घेवून त्यांना या विशेष अधिवेशनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजी व सिद्धगिरी हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने त्यांच्या या तुर्की दौऱ्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!