आर.सी.सी.कॉलमची ताकद ओळखणाऱ्या उपकरणाला पेटंट: डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला २६वे पेटंट

 

कोल्हापूर: आरसीसी कॉलमची स्ट्रेंथ काढण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणासाठी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला पेटंट मंजूर झाले आहे. महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रा. संतोष आळवेकर यांनी हे उपकरण संशोधित केले असून महाविद्यालयाला मिळालेले हे २६ वे पेटंट आहे.कोणत्याही इमारतीच्या बांधकामामध्ये आरसीसी कॉलम हे महत्त्वपूर्ण असतात. या कॉलमवरच इमारतीचा सर्व भर पेलला जातो, त्यामुळे त्याची मजबुती महत्वाची असते. प्रा. संतोष आळवेकर यांनी बनवलेल्या या उपकरणामध्ये आरसीसी कॉलमची ताकत, एकजिनसीपणा ओळखण्यासाठी सेन्सरचा उपयोग करण्यात आला आहे. या कॉलम मधील असणाऱ्या मटेरियलचे गुणधर्म, कॉलमवर पडलेल्या वजनाचा भार विभाजित करण्याची ताकद व त्याचे बांधकाम विषयक गुणधर्म याचा अभ्यास या उपकरणाद्वारे करता येणार आहे.या उपकरणामुळे सिव्हिल अभियंता व आर्किटेक्चर यांना कॉलमची कार्यक्षमता ओळखण्यास मदत होणार आहे. बांधकामामधील सुरक्षितता, कॉलम चे आयुष्य याबद्दल माहिती मिळून बांधकामांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. वाढती लोकसंख्या व जमिनीची उपलब्धता लक्षात घेता शहरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे बहुमतली इमारती बांधणे अनिवार्य बनले आहे. अशा प्रकारच्या इमारतींसाठी आरसीसी फ्रेम कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. या उपकरणाचा वापर कॉलमची मजबुती क्षमता अभ्यासण्यासाठी होऊ शकतो.या संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे व अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!