जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात

 

कोल्हापूर :संशोधनपर प्रयोगशील उद्योग निर्मिती क्षेत्रात कोल्हापूर मुख्यालयसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिसऱ्या पिढीत शेळके उद्योग समुह परिवार कार्यरत आहे. याच KAW ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग विभाग केएडब्ल्यू वेलोसे मोटर्स प्रा.लि.ने ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्हिएलएफला संयुक्त निर्मिती सह भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सन 1962 मध्ये द कोल्हापूर ऑटो वर्क्स म्हणून सुरुवात केलेल्या या उद्योग समुहास साखर कारखाना स्पेअर्स निर्मिती , सिमेंट, खाणकाम, ऑटोमोबाइल्स, रिअल इस्टेट आणि कृषी यंत्रसामग्री निर्मिती यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहा दशकांहून अधिक काळाचा समृद्ध अनुभव आहे. याच अनुभवाच्या आधारे नविण्याची सांगड घालत हा स्थानिक ते वैश्विक संयुक्त निर्मितीचा प्रकल्प सुरु होत आहे. यामुळे आता कोल्हापूरची विविध वाहनांची स्पेअरपार्ट करणारी उद्योग नगरी आता परिपूर्ण वाहन निर्मितीमुळे एक विधायक ओळख निर्माण करून युवकांना रोजगारही निर्माण करून देणार आहे. असा विश्वास चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ऑस्ट्रियाच्या केएसआर समुहाचा भाग असलेल्या आणि त्यांच्या अनोख्या डिझाइन्स व अचूक इंजिनियरिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रीक्स्टन मोटरसायकल्सने भारतात त्यांच्या मोटरसायकल्सचे उत्पादन व वितरण करण्यासाठी केएडब्ल्यू वेलोसे मोटर्सशी भागीदारी केली आहे. ब्रीक्स्टन 2024 च्या दसरा – दिवाळी सणासुदीच्या हंगामात चार मॉडेल्स पर्यंत भारतात सादर करण्याचे योजना आखत आहे, देशभरात विस्तृत डीलर नेटवर्क तयार करण्याचे लक्ष्य आहे.
जग विख्यात डिझायनर अलेस्सांद्रो तर्तारिनी यांनी स्थापन केलेल्या इटालियन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड व्हीएलएफ् देखील केएडब्ल्यू वेलोसे मोटर्सशी भागीदारी केली आहे. सणासुदीच्या हंगामात त्यांच्या संयुक्त निर्मितीच्या आयकॉनिक इलेक्ट्रिक स्कूटर टेनिस लाँच करणार आहे. व्हीएलएफ परंपरिक गॅसोलीन वाहनांना स्टायलिश आणि परवडणारे पर्याय देण्याचे ध्येय आहे, ज्यामुळे पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या आणि अपग्रेड शोधत असलेल्या अनुभवी रायडर्स यांसारख्या विविध ग्राहकांना आकर्षित करण्याचे ध्येय आहे. केएडब्ल्यू वेलोसे मोटर्स कोल्हापूर केंद्रीत महाराष्ट्रात वार्षिक चाळीस हजार वाहनांच्या उत्पादन क्षमतेसह अत्याधुनिक फॅक्टरीच्या सेटिंगचा फेज एकमध्ये आहे. फेज दोनमध्ये ही क्षमता वार्षिक एक लाखा वाहनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे, तसेच एक इन-हाउस आर ॲण्ड डी सेंटर देखील उभारले जाणार आहे. या उपक्रमामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिकासह पुणे – मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभाशाली तांत्रिक कुशल युवा वर्गाला मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. याच संदर्भाने केएडब्यू वेलोसे मोटर्स प्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके यांनी या प्रतिष्ठित औद्योगिक संस्था -ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत सादर करण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. स्थानिक अर्थव्यवस्था व मोटरसायकलिंग समुदायात सकारात्मक बदल दिसून येऊन कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाला गतिमानता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुनील शेळके उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!