‘गोकुळ’ देशातील आदर्श सहकारी संस्था: डॉ.महेश कदम

 

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी डॉ.महेश कदम म्हणाले, आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच गोकुळ असून गोकुळचा उल्लेख देशभरात सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून आवर्जून केला जातो. गोकुळ मधील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगला समन्वय असून प्रत्येकाला गोकुळ ही आपली संस्था आहे, अशी भावना याठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळेच आज गोकुळ प्रगती पथावर आहे. उपनिबंधक (दुग्ध) या पदावर कार्यरत असताना गोकुळ सोबत काम करताना खूप अभिमान, आनंद आणि समाधानाचा प्रत्यय आला. आज पदोन्नतीने नव्या पदावर रुजू झालेबद्दल या सत्कार प्रसंगी तोच अभिमान वाटत आहे. माझा गोकुळ सोबतचा असलेला ऋणानुबंध यापुढेही असाच सुरू राहील असे मनोगत व्यक्त केले. सहकारातील अग्रगण्य संस्था असलेल्या गोकुळ ने उत्तरोत्तर उत्कर्षाचे नवनवीन मानदंड प्रस्थापित करावेत अशा सदिच्छा दिल्या.यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!