
कोल्हापूर : बेंगलोर इथं नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील अवतार वैद्यकीय परिषद संपन्न झाली. किडनीशी संबंधित आजारावरील औषधोपचार आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सुसज्ज असणारी अवतार ही वैद्यकीय संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बेंगलोर इथंच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेत कोल्हापूरचे सुपुत्र डॉक्टर विपुल संघवी यांनी विशेष शोधनिबंध सादर केला. किडनीशी संबंधित संशोधन आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचे महत्त्व यावर आधारित त्यांनी सादर केलेल्या या शोधनिबंधाला परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला.डॉ.विपुल संघवी हे सध्या नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटल मध्ये किडनी विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. परदेशात उच्च दर्जाच वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर विपुल संघवी हे गेली पाच वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत आज त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध वैद्यकीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवून आपली क्षमता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळालेलं हे प्रथम क्रमांकाचे यश आपण कोल्हापूरच्या वैद्यकीय सेवेला अर्पण करत आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर विपुल संघवी यांनी व्यक्त केली.डॉ. विपुल संघवी हे प्रख्यात बालरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश संघवी यांचे सुपुत्र आहेत.
Leave a Reply