
कोल्हापूर: डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकची 25 वर्षांची वाटचाल अतिशय कौतुकास्पद आहे. सुमारे १० हजार अभियंते या पॉलिटेक्निकच्या माध्यमातून घडले असून भविष्यात हे कॉलेज आणखी नावलौकिक मिळवेल असा विश्वास डी. वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी व्यक्त केला.कसबा बावडा येथील डी वाय पाटील पॉलिटेक्निक रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ही संस्था मोठी करण्यात अनेक माजी प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज जगभरात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवली आहे. पॉलिटेक्निकने मिळवलेले हे यश अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. पॉलिटेक्निक नावारूपाला आणण्यासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे मोलाचे योगदान आहे. यावेळी विनय शिंदे, अभय जोशी, डॉ. सतीश पावसकर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष संजय भगत, माजी विद्यार्थी विकीराज माने, आमित भोसले, माजी कर्मचारी नीता सूर्यवंशी पाटील, टी. सी. हजारे, एन.डी. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर के शर्मा, सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, रजिस्ट्रार, पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply