आ.सतेज पाटील यांच्याकडून शाहू समाधीस्थळ, भगवा चौकची पाहणी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे नियोजन

 

कोल्हापूर:काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील माजी आमदार मालोजीराजे छत्रपति आ. जयंत आसगावकर यांनी सोमवारी सायंकाळी शाहू समाधीस्थळ व भगवा चौक, कसबा बाबडा येथे अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.काँग्रेस नेते राहुल गांधी हे 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच 5 ऑक्टोबर रोजी सकाळी राहुल गांधी शाहू समाधीस्थळ येथे भेट देऊन तेथे अभिवादन करणार आहेत. त्यानंतर संविधान सन्मान संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत.राहुल गांधी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वतीने उत्तम नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार पाटील यांनी मा. आ. मालोजीराजे छत्रपती आ.जयंत आसगावकर शहर उपअधिक्षक अजित टिके व पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या सोबत सोमवारी सायंकाळी उशिरा शाहू समाधीस्थळ व भगवा चौक कसबा बावडा येथे पाहणी केली.यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण शारंगधर देशमुख पोलीस उपअधीक्षक अजित टिके जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप सावंत शहर वाहतूकचे मनोज पाटील रियाज सुभेदार जय पटकारे अर्जुन माने धनंजय सावंत तोफिक मुल्लाणी श्रीराम संस्थेचे सभापती संतोष पाटील उपसभापती अनंत पाटील मानसिंग जाधव किशोर पाटील शिवराज जाधव अनुप पाटील प्रा. डॉक्टर महादेव नरके यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!