
कोल्हापुरातील दक्षिण मतदार संघामध्ये उमेदवारांची पुन्हा एकदा २०१९ सालचीच पुनरावृत्ती बघायला मिळणार आहे.महायुतीकडून अमल महाडिक आणि महाविकास आघाडी कडून ऋतुराज पाटील यांनी आज विधानसभेसाठी फॉर्म भरले. जुने गडी नवे राज्य याप्रमाणे दक्षिण मध्ये चित्र पाहायला मिळणार आहे.तसेच कोल्हापूर मध्ये असणाऱ्या परंपरागत शत्रुत्वाचा परिणाम येथेही बघायला मिळणार आहे. पुन्हा महाडिक आणि पाटील हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
पाच वर्षात काय विकास झाला याचा लेखाजोखा विद्यमान आमदार ऋतुराज पाटील सातत्याने मांडत आहेत. तर पाच वर्षात काहीच विकास झाला नाही. नुसती लोकांची दिशाभूल झाली. दक्षिण मतदारसंघ हा क्षीण झालेला आहे. अशी जोरदार टीका हे अमल महाडिक करत आहेत. झालेल्या विकासावर लोक समाधानी आहेत का? आणि ऋतुराज पाटील यांना पुन्हा एकदा संधी देतील का? किंवा लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत आणि लोक बदल घडवणार. याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे. यावेळी कौल कोणाला? अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता, खड्डे पडलेले रस्ते, गटारांची अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य यामुळे नागरिक असमाधानी आहेत.तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागामध्ये जास्त लक्ष केंद्रित करून अभ्यासिका केंद्र यासारख्या अनेक विकासाची कामे केल्याने समाधान आहे असे देखील नागरिकांतून बोलले गेले. यावरून आता कोणाचे पारडे जड होणार? आणि दक्षिण मतदार संघातील जनता मतपेटीत कोणाच्या नावे मतदान करणार हे आता पाहूया.
Leave a Reply