
कोल्हापूर: प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या रॅलीद्वारे खासदार शाहू छत्रपती महाराज,आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून ऋतुराज पाटील अर्ज दाखल केला. तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सौ. मधुरिमा राजे छत्रपती आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून राहूल पी. पाटील यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे संजय पवार यांची रॅली मध्ये प्रमुख उपस्थिती होती.
या रॅलीमध्ये काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, शिवसेना शहर प्रमुख रवी इंगवले, सुनील मोदी, आपचे संदीप देसाई, डी.जी. भास्कर, अतुल दिघे, जि.प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक चेतन नरके, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह दिलीप पवार, सरलाताई पाटील, बबनराव रानगे, बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, क्रांतिसिंह पवार-पाटील, कॉ. रघुनाथ कांबळे, इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
Leave a Reply