गोकुळमार्फत स्वर्गीय रविंद्र आपटे यांना श्रद्धांजली

 

कोलहापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन स्वर्गीय रविंद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवाराच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय रविंद्र आपटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, सन १९८६ पासून सलग ३५ वर्षे गोकुळचे संचालक आणि चार वर्ष अध्यक्ष असणारे स्व.रविंद्र आपटे हे सहकार व दुग्ध व्यवसाया तील राष्ट्रीय अभ्यासक होते त्यांच्या निधनाने दुग्ध व्यवसायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच गोकुळच्या जडणघडणी मोलाचे योगदान त्यांनी दिले. संघ हिताच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली होती. दूध उत्पादकांच्या समस्या ते सातत्याने मांडत होते, त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे गोकुळने चांगली प्रगती केली त्यांचे काम नेहमीच गोकुळ परिवाराच्या स्मरणात राहणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील -चुयेकर तसेच संघाचे अधिकारी डॉ.प्रकाश साळुंखे, शरद तुरंबेकर, मुंबईचे वितरक एस.एम.स्वामी यांनी मनोगत व्यक्त करून स्व. रविंद्र आपटे यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महा.व्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, मुंबईचे वितरक एस.एम.स्वामी, राजू पाटील, प्रकाश शिंदे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!