
कोल्हापूर: राज्यात चिमूरड्या मुलींवर अत्याचार होत आहेत. आणि त्यांना न्याय न देता भाजप सरकार अशा राक्षसी प्रवृत्तीला पाठीशी घालत आहे असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उजळाईवाडी या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दुर्गाशक्ती महिला मेळावा प्रचंड गर्दीत संपन्न झाला.याप्रसंगी जि.प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे, उपसरपंच संदीप माने, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी आडसूळ, मुडशिंगी सरपंच अश्विनी शिरगावे, पूजा ऋतुराज पाटील, स्मिता गवळी यांच्यासह सारिका माने, प्रतिभा पोवार, शैलजा भोसले, सोनाली मजगे, भाग्यश्री पारखे, शिल्पा हजारे, मेघा गुमाणे, डॉ. स्नेहल शिंदे, जहिदा इनामदार, काका पाटील, तौफिक मुल्लाणी, मनोज यलगुलवार, डी. जी. माने, संपत दळवी, गुंडू बागणे, सचिन पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Leave a Reply