उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई करा : भाजप महिला मोर्चाची मागणी

 

कोल्हापूर : चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्यावतीने, कोल्हापूरच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना आज निवेदन देण्यात आले. कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी अवमानकारक आणि चुकीचं वक्तव्य केले आहे. तर वाशीम जिल्ह्यातील प्रचार सभेत, उद्धव ठाकरे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल पातळी सोडून टीकाटिपणी केली. उद्धव ठाकरे यांच्या चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यासह अलका लांबा यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीनं करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांनी गेल्या १८ वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलंय. महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याबरोबरच, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने भरीव काम झालंय. महाडिक परिवाराकडून महिलांचा नेहमीच सन्मान केला जातोय. त्यामुळे खासदार महाडिक यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून, प्रक्षोभक आणि चुकीचं वक्तव्य करणार्‍या ठाकरे आणि लांबा यांच्यावर कारवाई होईपर्यंत भाजप महिला मोर्चा स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी रुपाराणी िनकम, तेजस्विनी पार्टे, रिमा पालकर, शीतल तिरुके, शारदा पोटे, सीमा पालकर, प्रणोती पाटील, रुपाली कुंभार, रंजना शिर्के, सरिका हारूगले, अलका जावीर, जिया अभंगे, रंजना रणवरे, हेमा उलपे, राजश्री उलपे, वंदना बंबलवाड, छाया ननवरे, अश्‍विनी गोपुगडे, शारदा देसाई यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!