
कोल्हापूर: सत्ता नसतानाही ऋतुराज पाटील यांनी निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास साधल्याने ते पुन्हा विधानसभेवर जातील.कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव येथे जाहीर सभा पार पडली. शिवसेना उपनेते संजय पवार यावेळी उपस्थित होते.सत्ता नसतानाही ऋतुराज पाटील यांनी निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास साधला आहे. या विकासकामांच्या जोरावरच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागरिक त्यांना निवडणुकीत विजयी करतील याची खात्री आहे. असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केल.यावेळी तामगावच्या धनगर समाजासह अनेक लोकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच प्रहार अपंग संघटनेने ऋतुराज संजय पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर यांच्यासह अनिल घाटगे, अवधूत साळोखे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, बबनराव शिंदे, रुपा वायदंडे, अर्जुन इंगळे, उत्तम आंबवडे, निशिकांत पाटील, टि. के. पाटील, संभाजीराव पाटील, दयानंद शिंदे, डी. डी. पाटील, गणपती कागले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
Leave a Reply