
कोल्हापूर: विखुरलेल्या, भयभीत झालेल्या आणि सद्यस्थितीतील समाज व्यवस्थेबद्दल प्रचंड चीड सहन करत असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणत मुस्लिम समाजाला संघठीत करण्यासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील तरुण एकत्र येत महाराष्ट्र मुस्लिम संघठन ही सामाजिक तथा राजकीय संघटना स्थापन करण्यात आली असून ही संघटना बहुजन समाजाचे देखील प्रतिनिधित्व करणार असल्याचे करवीरचे अपक्ष उमेदवार असिफ मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र मुस्लिम संघठन ही संघटना प्रथमतः कोल्हापूर जिल्हयात कार्यरत राहून लढेल. नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे राजकीय व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी विशेष परिश्रम घेणार आहे. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणणासाठी आवश्यक असणारी गरजांची पूर्तता करण्यासाठी संघटना स्वबळावर प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र मुस्लिम संघठन शिक्षण, आरोग्य, विधी, राजकीय तथा सामाजिक स्तर अशा पाच विभागात काम करणार आहे.
मुस्लिम समाजाचे ऋणानुबंध महाराष्ट्रातील इतर सर्व समाजाशी राखणे हे या संघटनेची मुख्य भुमिका असेल. मुस्लीम समाजाला फक्त व्होट बँक म्हणून बघीतले जाते. निवडणुका झाल्यानंतर मुस्लिम समाजाला आश्रय दिला जात नाही. मुस्लिम समाजाला व्होट जिहाद म्हणून हिणवले जाते. महायुती आणि महाविकास आघाडी फक्त वापर करून घेतात. या संघटनेमुळे मुस्लिम समाजाला एक स्वतंत्र अस्तित्व मिळेल असा विश्वास असिफ मुजावर यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस समाज सेविका बिल्की सय्यद, जाफर कादरमल, मुबारक मुल्ला, उद्बुद्दीन मणेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply