
कोल्हापूर : नवनिर्वाचित शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे आज विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना कार्यकर्ते, महायुती कार्यकर्ते, शहरातील तालीम संस्था, मंडळे, नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले. मुंबई हून राजेश क्षीरसागर आज कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे त्यांना शुभेच्छा देण्याकरिता कार्यकर्ते आणि नागरिकांची रीघ लागली होती.
सकाळी कार्यालयात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, वडील कै.विनायकराव क्षीरसागर, आई कै.मालन क्षीरसागर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यावेळी पत्नी सौ.वैशाली क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी शिवसेना महिला आघाडीने आमदार राजेश क्षीरसागर यांचे औक्षण ओवाळून पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यानंतर आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पूजा भोर, अमरजा पाटील, पवित्रा रांगणेकर, पूजा आरदांडे, गौरी माळदकर, पूजा कामते, सुनिता भोपळे, पूजा पाटील, प्रीती अतिग्रे, राधिका पारखी, गीता भंडारी, सना अत्तार, वैशाली उगवे, विशाखा कांबळे, स्वाती घाटगे, माधुरी वाठारे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.युवा सेनेकडून चांदीची गदा देवून आमदार क्षीरसागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Leave a Reply